नळदुर्ग (प्रतिनिधी)  - उपेक्षित भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी धाराशिव जिल्ह्याचे  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या अधिपत्याखाली व तुळजापुरचे तहसिलदार आरविंद बोळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन उपेक्षित वंचित घटकातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तुळजापूर तहसिलचे नायब तहसिलदार तथा शिबीर कार्यक्रमाचे नोडल आधिकारी एम.डी.पांचाळ यांनी नळदुर्ग ययेथे बोलताना केले.

  दि.5 सप्टेंबर 2023 रोजी जि.प.प्रशाला (मुलांची) नळदुर्ग येथील सभागृहात भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांकरीता तुळजापुर तहसिल मार्फत विषेश शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी नायब तहसिलदार पांचाळ बोलत होते.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन  एस.के.गायकवाड  यांनी केले. याप्रसंगी तुळजापूर तहसिलचा संगायो विभाग, पुरवठा विभाग, जात प्रमाणपत्र विभाग, अधार कार्ड विभाग आदी विभागाचे सर्व पेशकर,कर्मचारी, कारकुन अव्वल कारकुन,कोतवाल, व मतदार नाव नोंदणी विभागाचे नळदुर्ग सर्कल मधील सर्व बिएलओ ग्रामसेवक, सहशिक्षक आपापल्या परीने दिवसभर उपस्थित लाभार्थी ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

  यावेळी मंडल आधिकारी जयंत गायकवाड,पवन भोकरे, एन.यु.शिंदे, पारधी समाजाचे  पंडीत भोसले,  दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते प्रबोध कांबळे, कुंदन भोसले,पिंकी भोसले यांच्यासह पारधी,डवरी गोसावी,वडार,महादेव कोळी ,मसनजोगी वगैरे भटक्या विमुक्त जाती जमातील ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top