नळदुर्ग (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यातील आंतरवली सराठी येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ व मराठा समाजाला 50% च्या आतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी नळदुर्ग येथे दि. 8 सप्टेंबर 2023 वार शुक्रवार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन नळदुर्ग शहरातील व ग्रामीण भागातील सकल मराठा परिवाराच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना देण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 50% च्या आतून ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे, दरम्यान हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शासनाकडून पोलिसा मार्फत लाठीचार्ज करण्यात आला, या घटनेने सर्वानाच धक्का बसला आहे, या मध्ये अनेक वृद्ध महिला जखमी झाल्या आहेत, त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मराठा समाजाला 50% च्या आतून ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी नळदुर्ग शहर व परिसरातील ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या वतीने नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गावर बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, हे आंदोलन दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी साडे अकरा वाजता करण्यात येणार आहे, दरम्यान येथील किल्ला गेट पासून मुख्य बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या नंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे निवेदन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना देण्यात आले असून या वेळी सकल मराठा परिवाराचे कमलाकर चव्हाण, शहापूरचे नानासाहेब पाटील, वागदरीचे आमोल पाटील, आंबाबई देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश जाधव, येडोळ्याचे राजेंद्र जाधव, दीपक काशीद, तानाजी जाधव, गणेश मोरडे, दिनेश जगताप, नेताजी काळे, नितीन काळे, वैभव पाटील,संदीप गायकवाड, बबन चौधरी, श्रीधर नरवडे, जितेंद्र पाटील, संजय जाधव, उदय जगदाळे,उमेश जाधव, संतोष मुळे, बालाजी मोरे, नितीन गायकवाड, भगवंत सुरवसे, दादा नागणें, बंटी मुळे, युवराज जगताप, बबन साळुंखे, आकाश काळे, शिवाजी धुमाळ,आदी सह बहुसंख्य मराठा परिवार उपस्थित होता.