धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा स्तरीय शालेय शूटिंग बॉल क्रीडा स्पर्धा दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी धाराशिव येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ (यमगरवाडी) तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी  घव घवीत यश संपादन केले.

तीन संघ विभागासाठी पत्र झाले आहेत. 17 वर्ष वयोगट मुलांमध्ये प्रथम क्रमांक, 19 वर्ष वयोगट मुलांमध्ये द्वितीय क्रमांक, 17 वर्ष वयोगट मुलींमध्ये प्रथम क्रमांक, 19 वर्ष वयोगट मुलींमध्ये प्रथम क्रमांक  मिळाऊन यश संपादन केले. व या सर्व प्रथम क्रमांक आलेल्या खेळाडूंची पुढे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यांनी शुटींग बॉल मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, शुटींग बॉल प्रशिक्षक यशवंत निंबाळकर, बालाजी क्षीरसागर  यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी वैदू, कार्यवाह, विवेकजी आयचीत, उपाध्यक्ष डॉ.अभयजी शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी  अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top