धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी .औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिमत्व विकास व इनसाईड इन नोवेल फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी या विषयावर एक दिवसीय सेमिनार संपन्न झाला.या सेमिनार मध्ये मार्गदर्शक म्हणून मनोज पारडे व इंटिग्रेटेड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ऑफिसचे डिलिव्हरी मॅनेजर डॉ.बाळासाहेब वाघ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सेमिनारच्या पहिल्या सत्रामध्ये व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलताना मनोज पारडे यांनी बी.फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करत असताना करिअरच्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यक्तिमत्व विकास किती प्रमाणामध्ये आवश्यक आहे .तसेच विद्यार्थ्यांचा बाह्यंग विकास न होता तो अंतरंगाने कसा होईल याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. आणि व्यक्तिमत्व विकासाबरोबरच कम्युनिकेशन स्किल हे किती महत्त्वाचे असते हेही विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
दुसऱ्या सत्रामध्ये डॉ.बाळासाहेब वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात फार्मसी क्षेत्र काल,आज आणि उद्या, फार्मसी क्षेत्राचा वाढत चाललेले महत्त्व, फार्मसी क्षेत्रांमध्ये निर्माण झालेल्या संधी आणि जगाचा भारताकडे फार्मसीच्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी अत्यंत सखोल मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी निशी नंदन शिंदे ,असलम तांबोळी ,राम लोमटे यांनी जबाबदारी पार पाडली सदरील कार्यक्रमास 400 ते 500 विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली.