तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील कामठा येथे व तुळजापूर काक्रंबा रोडवरील सोलापूर बायपास रस्त्यावर असणाऱ्या चौकात  गावठी कट्टा व पिस्टल जवळ बाळगणा-या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

काक्रंबा रोडवरील सोलापूर बायपास रस्तावर असणाऱ्या चौकात रविवार दि 18 सप्टेंबर रोजी सांयकाळी सवा सहा वाजता 37 वर्षिय इसम संभाजी लक्ष्मण अमृतराव वय 37 वर्ष रा. खडकाळगल्ली तुळजापुर ता. तुळजापुर जि. धाराशिव  याची  अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक लोखंडी धातुचे फिकट पांढऱ्या रंगाची देशी बनावटीची पिस्टल व एक पितळी धातुचा अंदाजे 2.5 सेंटीमिटर लांबीचा जिवंत काडतूस असा मुददेमाल मिळुन आला.

तर दुसऱ्या घटनेत कामठा येथे सोमवार दि. 19 सप्टेंबर रोजी 3, 4, 25 शस्त्र अधिनियममधील फरार आरोपी जमीर उर्फ जम्मु शब्बीर सय्यद रा. कामठा ता. तुळजापुर जि. धाराशिव गावात आल्याची माहिती मिळाताच सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, पोना माळी, पोलिस पवार यांनी कामठा येथे जावुन पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक लोखंडी धातुचे फिकट काळसर रंगाची देशी बनावटीची पिस्टल गावठी कटटा व एक पितळी धातुची 7.6  व्यास असलेला लांबी 2.5 इंच असलेला जिवंत

काडतुस असा मुद्देमाल मिळुन आला. त्यास आज तुळजापूर न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक  नवनीत कॉवत,  उपविभागीय  पोलीस अधिकारी निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक ग़जानन घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली झालेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि कांबळे हे करीत आहेत.


 
Top