धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिलवडी येथे दि.11 स्पटेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 527 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 120 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे स्वातंत्र्य सैनिक शिवजी जाधव, मा. उपसरपंच अजित सावंत, मा. प.स. सदस्य दिपक पाटील, सतिश जाधव, अनिल जाधव, नाभिराज चौगुले, प्रदिप जाधव, औदुंबर हरिचंद्र दिंडोळे, यंशवत जाधव, प्रशांत जाधव, अरुण सारफळे, विष्णु तांबे, संतोष राजगुरु, ओम जाधव, शुभम जाधव, रत्नदिप बोराडे इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अत्रिनंडन शेट्टी, डॉ. शुभम राठोड, डॉ.जयेश बाहेरकर, डॉ. दामिनी पुरी, डॉ. प्राजक्ता शेटे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे अमीन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, प्रा. आरोग्य केंद्र पोहनेर चे डॉ. वंदना गजधणे, हणुमंत गुजर व संतोष सुरवसे, आशा कार्यकर्त्या रंजना जाधव, स्वाती दळवी यांनी परिश्रम घेतले.