धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हास्तर शालेय योगासन क्रीडा स्पर्धा दि.10 सप्टेंबर 2023 रोजी तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये तुळजापूर तालुक्यातील एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ (यमगरवाडी) येथील विद्यार्थ्यांनी योगामध्ये घवघवीत यश संपादन केले. सात विद्यार्थ्यांची पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

14 वर्षाखालील मुली जनवी क्षीरसागर - चौथा  क्रमांक 17 वर्षाखालील मुली  सोनाली गिरी - तृतीय क्रमांक 17 वर्षाखालील मुले प्रेमराज विभुते - द्वितीय क्रमांक प्रविण सुपलकर - तृतीय  क्रमांक महेश राठोड - चौथा  क्रमांक, केतन शिंदे - पाचवा क्रमांक. तर 19 वर्षाखालील मुली सक्षी गायकवाड - प्रथम क्रमांक मिळाऊन यश संपादन केले. यांनी योगासन मध्ये चांगली कामगिरी केली व सात खेळाडूंची पुढे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या सर्व खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर ,योगा प्रशिक्षक, प्रणिता ताई यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू, कार्यवाह, विवेक आयचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी  अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top