धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी  येथे दि.10 स्पटेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

गंजेवाडी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 410 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 70 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे सरपंच शाईन शेख, उपसरपंच जाबुवंत गंजे, ग्रा.प. सदस्य विकास जाधव, सुदर्शन जाधव,बंडु पाटील, कृष्णात बोबडे, ग्रामसेवक इंब्राहीम शेखा, अभिमान पाटील, दत्ता शिंदे, आप्पासाहेब बोबडे, समधान काळे, फियाज शेख, सागर सुर्यभान गंजे, बळवंत गंजे, सागर जाबुंवत गंजे इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अत्रिनंडन शेट्टी, डॉ. शुभम राठोड, डॉ.जयेश बाहेरकर, डॉ. दामिनी पुरी, डॉ. प्राजक्ता शेटे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, प्रा. आरोग्य केंद्र सावरगाव च्या आशा कार्यकर्त्या शितल भोपळे यांनी परिश्रम घेतले.


 
Top