धाराशिव (प्रतिनिधी)-नवीन संसद भवनात महिला विधायक सरकारच्यावतीने मांडण्यात आले. आम्ही त्या विधायकाला पाठिबा दिला. खरे तर सरकारने लगेच महिला आरक्षण लागू करणे आवश्यक आहे. 2029 पासून हे आरक्षण सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने महिला विधायक मांडून थांबू नये. पुढे जावून त्यांनी महिला समोरील वाढती महागाई, महिला पहेलवान आंदोलन, महिलांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
एन. व्ही. पी. शुगर फैक्टरीच्या कार्यक्रमानिमित्ताने खासदार ओमराजेनिंबाळकर यांना पत्रकारांनी विविध प्रश्नावर बोलते केले. नवीन संसद भवन कसे वाटले या संदर्भात विचारले असता खासदार ओमरोजनिंबाळकर यांनी नवे संसद भवन हे सुसज्ज असून, चांगली वास्तू आहे. परंतु जुन्या संसद भवनला ज्या प्रमाणे देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे जुन्या संसद भवनला एक ऐतिहासिक महत्व आहे. विशेष म्हणजे नवीन संसद भवनात प्रश्नोत्तराचे तास न होता फक्त शासकीय कामकाज झाले. लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकसभेत पाठविले आहे. त्यामुळे नवीन संसद भवनात प्रश्नोत्तराचे तास होणे आवश्यक आहेत असे मतही खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.