धाराशिव (प्रतिनिधी) -मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार, दि.7 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र झाला आहे. राज्य सरकारने लाठीचार्ज, गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठा मागे हटण्यास तयार नसल्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळले आहे. मराठा समाजाविरोधात राज्यातील सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव येथील निलेश साळुंके व कौडगाव येथील अक्षय नाईकवाडी हे आमरण उपोषणास बसत आहेत. या आंदोलनात मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top