धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील सोनेगाव येथे दि.04 सप्टेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

सोनेगाव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 721 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 149 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे प्रमोद पवार, संदिप शिंगाडे, आबासाहेब वायकर, संदिप कुंडलीक शिंगाडे, सुधाकर सांगले, सुधीर शिंदे, सुधाकर चांदणे, विलास कोंडारे, गोपाळ पाटील, जोतीराम मोरे, भीमराव गोफणे,  प्रदिप राजाराम गोफणे, शहाजी गोरख गोफणे, अमोल  विधाते, दत्तात्रय वायकर नानासाहेब वायकर इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सिध्दांत पेठकर, डॉ. लक्ष्मण इंगळे, डॉ.वेदांत रणाळकर, डॉ. शायेब शेख, डॉ. सोरभ इंगळे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे अमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, प्रा. आरोग्य उपकेंद्र सोनेगाव च्या आरोग्य सेविका कल्पना कुदळे, परिचारीका गायत्री वायकर आशा कार्यकर्त्या संगिता गोफणे, अर्चना घोगरे, अंगणवाडी सेविका छाया माळवदकर, विजया मोरे, यांनी परिश्रम घेतले.


 
Top