धाराशिव (प्रतिनिधी)-भाजपा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित कामांना प्राधान्याने निधी दिला जात आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे महामार्गाला भरीव निधी देण्यात आला आहे. तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी 110 कोटी दिले. तर धाराशिव शहरातून गेलेल्या सर्व्हीस रोडसाठीही लवकरच निधीचे पत्र मिळेल अशी माहिती लोकसभा  भाजपचेव संयोजक नितीन काळे यांनी दिली आहे.

काळे पुढे बोलताना म्हणाले की, विरोधकांनी कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरी हरकत नाही, मात्र देशात व राज्यात सरकार भाजपाचे आहे. निधीही त्या माध्यमातून उपलब्ध होत आहे व अभूतपूर्व अशा स्थानिक विकासासाठी व लागणाऱ्या निधीसाठी भाजपा नेते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अनेक वेळा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत या अनुषंगाने बैठका घेण्यात आल्या होत्या. आता या कामासाठी निधी उपलब्ध झाला असल्याने काक्रंबा व परिसरातील नागरिकांसह या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. सिंदफळ येथील उड्डाणपुलाच्या रु 31 कोटीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर जळकोट येथे अंडरपास साठी रु 18 कोटी मंजूर आहेत. या सर्व कामांसाठी अनमोल सहकार्य करणारे केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी सहकार्य केल्याचे नितीन काळे यांनी सांगितले.



 
Top