धाराशिव (प्रतिनिधी) - येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अंतर्गत गुणवत्ता आणि कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय उद्बोधन कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

पुणे येथील जी.टी.टी. या नामवंत कंपनीच्या प्लेसमेंट अधिकारी कुमारी प्रियंका माळी या एकदिवसीय उद्बोधन कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

  विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्याची स्वप्न पाहिली पाहिजेत आणि उज्वल भविष्यासाठी कौशल्य आत्मसात केले पाहिजे तरच आपले स्वप्न सत्यात उतरवता येईल असे जीटीटी कंपनीच्या प्लेसमेंट अधिकारी कुमारी प्रियंका माळी यावेळी म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही दरवर्षी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने ट्रेनिंग देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतो. या उपक्रमामध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. माधव उगिले हे होते. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. उगिले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच इतर ज्ञानही आत्मसात केले पाहिजे.तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकाल. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचलन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी केले.  आभार डॉ. दत्तात्रय साखरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. बालाजी नगरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top