धाराशिव (प्रतिनिधी) -  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र.1वैराग रोड धाराशिव येथे आयुष्यमान भव कार्यक्रमा अंतर्गत 18 वर्षा वरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणीचा शुभारंभ जिल्हास्तरीय जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी मा.डॉ कुलदीप मिटकरी व अतिरिक्त ज़िल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे यांनी फित कापून  शुभारंभ केले. या वेळी  -1 चे वैद्यकीय अधिकारी डॉ खान तसेच आपला दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी,उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.मिटकरी यांनी पुरुषांच्या तपासणीचे संपूर्ण महत्त्व पटवून दिले. तसेच रुग्णांची आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येईल, आत्यवस्थ रुग्णांना संदर्भित करताना 108 रुग्णवाहिकाचा वापर, मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास रुग्णांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालया मार्फत शस्त्रक्रिया, रुग्णांना विभागातील सर्व आरोग्य संस्था मार्फत संदर्भ सेवा, ई संजीवनी टेलीकन्सलटेशन माध्यमातून रुग्णांना तज्ञांच्या सेवा उपलब्ध आहेत. आणि जास्ती जास्त पुरुषांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी केले.

तसेच अभियान कालावधी दिनांक 17 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मारुती कोरे यांनी सांगितले. आणि या कार्यक्रम उद्घाटन दरम्यान झाडे लावण्यात आली.

याप्रसंगी  कन्सल्टंट डॉ. पल्लवी धनके, जिल्हा विस्तार व मध्यम अधिकारी रेणुका राठोड, सर्व आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top