धाराशिव (प्रतिनिधी) - देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारून मराठवाडा निजामापासून मुक्त करून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला जोडण्यात आला, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पारवे यांनी केले.  

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंगोली येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव उत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक  प्रदीप तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शाळेतील शहीद स्मारकाचे पूजन करण्यात आले.  यावेळी  विस्ताराधिकारी, व केंद्रप्रमुख प्रमुख पाहुणे,अनुरथ नागटिळक  आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पारवे बोलत होते. दरम्यान  सर्व शिक्षकांच्या निधीमधून विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पायाळ सर, श्रीमती पाटील मॅडम, शिंगोली गावचे बीएलओ सतीश शहाजी कुंभार यांनी पुढाकार घेतला.  सूत्रसंचालन जमाले  यांनी  केले.  आभार प्रदर्शन सुनील चव्हाण यांनी केले. कार्यक्रमासाठी गावकरी, विद्यार्थी, शाळेची कर्मचारी हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


 
Top