नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरांतील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवुन खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा केला आहे.
धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाने यावर्षी गणेशोत्सवात मंडळाचे दिवंगत कार्यकर्ते कै. ओंकार स्वामी, कै. पंकज ग्रामोपाध्ये व कै. आकाश घोगरे यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. मंडळाने यावर्षी गणेशोत्सवात रक्तदान शिबिर, कुमारसागर महाराज यांचे कीर्तन तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्त मंडळाने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 46 गणेश भक्तांनी रक्तदान केले होते. त्याचबरोबर कुमारसागर महाराज लोहारेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून नागरीकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा एक चांगला प्रयत्न केला.
त्याचबरोबर दि.26 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या वतीने शहरांतील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार हुतात्मा निलय्या स्वामी यांचे नातु आप्पु स्वामी, स्वातंत्र्य सैनिक कै. वसंतराव वैद्य यांचे सुपुत्र राजकुमार वैद्य, स्वातंत्र्य सैनिक कै. गोपाळराव भुमकर यांचे सुपुत्र विनायक भुमकर,स्वातंत्र्य सैनिक कै. रामचंद्र साखरे यांचे नातु धनराज साखरे, स्वातंत्र्य सैनिक कै. जाफरसाब फुलारी यांचे नातु मोहसीन अबुबकर फुलारी, स्वातंत्र्य सैनिक कै. काशिनाथराव स्वामी यांचे नातु प्रकाश स्वामी, स्वातंत्र्य सैनिक कै. बाबुराव काटकर यांची कन्या सुगलाबाई गव्हाणे व स्वातंत्र्य सैनिक कै. बाबुराव यादगिरे यांचे नातु नरेंद्र यादगिरे यांचा यावेळी मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष शरद देशमुख, सतीश जाधव, संतोष वाले, संतोष जाधव, संजय स्वामी, रमेश जाधव, राजेंद्र महाबोले यांनी सत्कार केला.
हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, रमेश जाधव, महालिंग स्वामी, उमेश जाधव, सुनिल गव्हाणे, संतोष वाले, संतोष जाधव, गणेश मोरडे, अजित भुमकर,श्रीशैल्य स्वामी, सचिन भुमकर यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.