तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा येथील मनोज विष्णू शिरगिरे 28 याने नापीकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरात लोखंडी अँगलचा आडुला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याचावर सोमवार सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोजला पंधरा दिवसा पुर्वी मुलगा झाला होता. त्याचा निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.



 
Top