कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील मौजे खामसवाडी येथील श्री शाकिर रसुल आत्तार यांचे रेशनकार्ड गेल्या 4 महिन्यापासुन बंद होते.त्यामुळे त्यांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत होते.त्या संदर्भात लाल पँथर संघटना व मानवहित लोकशाही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे धाव घेऊन कैफियत मांडली.शाकिर आत्तार हे दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांना कसल्याही प्रकारची जमीन नाही. त्यांचे रेशनकार्ड हे आँनलाईन करत असताना नजरचुकीने शेतकरी लाभार्थी यादी मध्ये नाव गेले होते. त्यामुळे शाकिर आत्तार यांचे धान्य बंद झाले होते. त्यामुळे त्यांचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आज तहसिल कार्यालयाच्या वतीने त्यांना पिवळी शिधापत्रिका देण्यात येऊन अंत्योदय योजनेत समावेश करण्यात आला. अत्तार यांचे रेशन कार्ड पुरवठा विभागाचे पेशकार आर.डी.पवार यांनी तात्काळ आँनलाईन करुन एक महिन्यात धान्य सुरू करुन देण्याचे आश्वासन दिले. या वेळी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केल्यामुळे अत्तार यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी लाल पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे,मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, जिल्हाध्यक्षा सौ माया शिंदे, दिव्यांग कार्यकर्ते संजय नरसिंगे यांच्या सोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top