धाराशिव (प्रतिनिधी)-शहर, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सर्व आस्थापना चालकांनी तसेच रूग्णालय, शाळा, महाविद्यालय, हॉटेल चालकांनी एक सीसीटीव्ही कॅमेरा शहर, गावासाठी या संकल्पनेतून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. 

चोरीच्या, भांडणाच्या घटनेत वाढ झाली आहे. अवैध धंदे बोकाळले आहे. त्यावर नियंत्रणासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र रात्री-अपरात्री होणाऱ्या घटना किंवा चोरी याची माहिती मिळण्यासाठी त्याचा छडा लावण्यासाठी अडचण येते. ती दूर करून सर्वांना सुरक्षा मिळावी यासाठी ज्या आस्थापना चालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे, त्यांनी एक कॅमेरा शहर, गावासाठी म्हणून रस्त्यावरील दिसेल अशा पध्दतीने लावावा. त्यामुळे चोरीसह अवैध धंदे आणि अन्य गैर कामांना आळा बसू शकतो. त्यासाठी सर्वांना आम्ही भेटून आवाहन करत आहे. तसेच काहींच्या बैठक घेतल्या असून, गावातही पोलिस स्टेशन पातळीवर त्यावर काम सुरू असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. प्रशासनाला सर्वंच ठिकाणी कॅमेरे लावणे शक्य नाही. मात्र या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वंत्र नजर ठेवता येवू शकते, त्यातून सर्वांनाच सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न असल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. 


 
Top