तुळजापूर (प्रतिनिधी)- जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराच्या निषेधार्थ सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने  सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी गाव बंद ठेवुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.        

तुळजापूर सोलापूर महामार्ग रस्त्यावर मराठवाडा हद्दीवरचे हे शेवटचे गाव तामलवाडी असुन या रस्ता रोको आंदोलन मुळे काही काळ महामार्ग वाहतुक ठप्प झाल्याने वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली होती. यावेळी  प्रशासनास सकल मराठा  समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनास तामलवाडी व आजूबाजूच्या गावांतील सर्व धर्मीय बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होते.


 
Top