तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद चे प्रभारी मुख्याधिकारी व नळदुर्ग नगरपरिषदचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, यांची परिविक्षाधिन प्रक्षिणासाठी मुख्याधिकारी गट ब - अधिकाऱ्यांच्या पायाभुत प्रक्षिणासाठी निवड झाली असुन 04.09.2023 ते 15.09.2023 कालावधीत नागपूर येथे प्रशिक्षणास जात असल्याने त्यांच्या तुळजापूर नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारीपदी गिरीष पंडीत मुख्याधिकारी नगरपंचायत, वाशी जि. धाराशिव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सचिन भुजबळ, मुख्याधिकारी नगर परिषद, मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांची नळदुर्ग प्रभारी मुख्याधिकारी नगरपरिषद, नळदुर्ग ता. तुळजापूर यांचा पदभार दिला आहे. नुतन अतिरिक्त मुख्याधिकारी गिरीष पंडित हे उद्या रुजू होण्याची शक्यता आहे. पुढील आदेशा येई पर्यंत म्हणजे यात्रा यांच्याच काळात होईल असे वाटते.