कळंब (प्रतिनिधी)- पुस्तकाच्या खजिन्याने प्रशालाचे ग्रंथालय समृद्ध होत आहेत. चांगले विचार पेरले की चांगली माणसे आपोआप जोडली जातात“. या विचाराची प्रचिती साठी  ईटकुर येथील शाळेला पुस्तके देवून आली.

प्रशाला ईटकुर च्या ग्रंथालय विभागाचा  एक पुस्तक शाळेसाठी या उपक्रमच वाचून पुणे येथील उद्योजक शरद सावंत  व जगदंब प्रतिष्ठान पाथर्डी येथील युवकांनी  प्रतिष्ठान च्या  तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रशालेला   3300 रुपये किमितीची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.पंडीत देशमुख, . राहुल धेले , युवा सेना कळंब तालुका सरचिटणीस पवन सावंत, प्रताप सावंत, काका पिंगळे, बालाजी पिंगळे, बालाजी काकडे, कैलास धेले ,बालाजी सावंत व इतर तरुण मंडळी उपस्थित होते.

या वेळी .पंडीत देशमुख यांनी वाचनाचे महत्व सांगितले. तर  राहुल धेले यांनी स्वामी विवेकानंदांचे उदाहरण देत वाचनाने माणुस त्याच्या ध्येयापर्यंत कसा पोहचतो हे सांगितले. तर ईटकुर एक दिवस पुस्तकाचे गाव करा अशी प्रेरणादायी सुचनाही दिली. तसेच  शरद सावंत  यांनी प्रशालेच्या गुणवत्तेचे कौतुक करत स्पर्धा परीक्षेच्या यशा बद्दल अभिनंदन केले. या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. गरुडे सर यांनी अध्यक्षीय समारोप केला. या वेळी श्रीम. अंजली यादव मॅडम ग्रंथालय विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.


 
Top