धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे दि.03 स्पटेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
केमवाडी येथे दि. 03 स्पटेंबर रोजी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 510 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 90 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीराचे उदघाटन उपसरपंच संतोष पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे सरपंच गजानन कोकरे, उपसरपंच प्रशांत फंड, ग्रा.प. केशव पाटील, आदम पठाण, अर्जुन खोत इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सिध्दांत पेठकर, डॉ. लक्ष्मण इंगळे, डॉ.वेदांत रणाळकर, डॉ. शायेब शेख, डॉ. सोरभ इंगळे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, प्रा. आरोग्य केंद्र सावरगाव च्या आशा कार्यकर्त्या आशा काशीद, अंजना ताटे यांनी परिश्रम घेतले.