तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीगणेश उत्सवा निमित्ताने श्रीतुळजाभवानी नेञालयाच्या वतीने घेण्यात गुरुवार दि 21 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोफत नेञ तपासणी शिबीरात पन्नास रुग्णांची नेञ तपासणी नेञरोग तज्ञ डाँ गीतांजली कुंडलिक माने यांनी केली.

मारूती स्कायलाइन मल्टीपर्पज सोशल फाऊंडेशन धोत्री, ता. तुळजापुर संचलित  श्रीतुळजाभवानी नेञ रुग्णालय वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेञरोग शिबीरात डोळ्यांच्या विविध आजाराने ञस्त असलेल्या पन्नास स्ञीपुरुष रुग्णांची  तपासणी करण्यात आली सदरील रुग्णांची तपासणी सुप्रसिद्ध  नेञरोग तज्ञ डॉ. गीतांजली कुंडलिक माने यांनी काचबिंन्दू मोतीबिंन्दू  डोळ्यावर मास आलेले तसेच कमी अधिक डोळ्याने न दिसणाऱ्या रुग्णांची तपासणी करुन उपचार करुन चेष्मे वाटप  करण्यात आली. तसेच बीपी शुगरमुळे डोळ्यावर होणाऱ्या परिणाम बाबतीत सविस्तर माहिती सांगुन  मार्गदर्शन डॉ. गितांजली कुंडलिक माने यांनी केले. या शिबीर यशस्वीते साठी प्रणित देशमुख, पायल हवले, जयश्री पवार सह श्रीतुळजाभवानी नेञालयातील कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.


 
Top