तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर नगरीत तब्बल तीनशे वर्षापूर्वीचे आडातील गणपती मंदिर असून, अतिप्राचीन असलेल्या हे मंदिर इ स 1704 चे असल्याचे सांगितले जात  असून, तब्बल 60 फुट खोल आडात आहे. ऐरव्ही गणेशोत्सव काळात पाण्यात असणारी  श्रीगणेश मुर्ती  यंदा माञ पावसाने ओढ दिल्याने सध्या या मंदिरातील विघ्नहर्ता गणेशाची मुर्ती पाऊस नसल्याने पूर्णपणे पहावयास मिळत आहे.     

सरासरी इतका पाऊस झाला की सदरील श्रीगणेश मुर्ती पुर्ण किंवा अर्धी पाण्यात जाते यंदा माञ पावसाने ओढ दिल्याने भुर्गभात पाणीपातळीत वाढ न झाल्याने सदरील मुर्ती पाण्याविना असुन सध्या या मुर्तीजवळ जावुन भाविकांना दर्शन घेता येते. सदरील मुर्ती पाण्यात असेल तर माञ मंदीर प्रवेशद्वारातील पायरीवरुन मंदिरातील जलाचे पुजन करुन श्रीगणेशचे दर्शन झाले असे भाविक मानतात. माञ यंदा निसर्गाचा अवकृपेचा फटका देवदेवतांनाही बसत असल्याचे बोलले जाते.   

इ. स. 1704 मध्ये आडाचे काम करताना या ठिकाणी मुर्ती सापडल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर येथेच या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, येथे अतिप्राचीन असा तब्बल 60 फुट खोल आड असून, यातील गणेश मंदिर जमिनीपासून 20 फूट खोल अंतरावर आहे. श्री गणेशाचे हे मंदिर हेमाडपंथीय असून, हवा व प्रकाश मिळावा म्हणून वरच्या बाजूला शिखराचे बांधकाम न करता मोकळी जागा सोडण्यात आली आहे. या आडातील गणेशाच्या दर्शनासाठी दर महिन्यात चतुर्थी व श्री गणेशोत्सवाला मोठी गर्दी असते. या मंदिरातील गणेशाची मुर्ती शेंद्य्रा रंगाची व बैठ्या प्रकारातील मुर्ती असून, ती आडाचे काम करताना सापडल्याची माहिती सांगितले जाते.


 
Top