धाराशिव (प्रतिनिधी)- गुटखा तयार करणाऱ्या कारखान्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत उमरगा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दि. 17 सप्टेंबर रोजी अचानकपणे कारखान्यावर छापा मारला. यावेळी कारखान्यातील 48 लाख 45 हजार 500 रूपयांचा मशीनरी व मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपी अटक करून उर्वरीत आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दि.15.09.2023 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रिलायन्स पेट्रोलपंप चौरस्ता उमरगाचे पाठीमागील शेतशिवारात बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये अवेधरित्या गुटखा तयार करुन साठा करुन विक्री व्यवसाय करत आहेत अशी माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीची खात्री करुन नमुद ठिकाणी पाहणी करुन त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पारेकर, सपोनि कासार, मपोउनि माने, पोलीस हावलदार घोळसगाव, बोईने, मारेकर, गायकवाड, खतीब, पोलीस नाईक- सय्यद, कावळे, राउत, कांबळे, पोलीस अमंलदार- उंबरे, मुळे, मते, भोरे, सगर, सोनटक्के, बिराजदार, व दोन पंच या सर्वांनी सदर ठिकाणी छापा मारला. यावेळी गुटखा तयार करणारे 09 मिक्सर मशिन, गुटखा तयार करण्यासाठी लागणारे सुपारी, जर्दा, कात, सुगंधी तंबाखु व तयार पॅकींग केलेला गोवा गुटखा माल व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन टाटा टेम्पो ट्रक एमएच 13 सीयु 5126 असा एकुण 48,45,500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी बस्वराज दिलीप बिराजदार, वय 29 वर्षे, रा. आरोग्य नगरी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव याचे विरुध्द पोलीस ठाणे उमरगा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली सदर कामगिरी करण्यात आली.


 
Top