तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवातील महत्त्वाच्या गर्दीच्या दिनी दोन लाख भाविक येतील असे गृहीत धरुन नियोजन केले जात असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पञकार परिषदेत दिली.
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवाचा सोमवार दि. 25 रोजी आढावा घेतल्यानंतर पञकारांशी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले कि, शुक्रवार दि 6 आँक्टोबर देविजींची मंचकी निद्रा, रविवार दि. 15 आँक्टोबर घटस्थापना व रविवार दि. 29 ऑक्टोबर मंदीर पोर्णिमा हे या नवराञोत्सतील महत्वाचे गर्दी होणारे दिवस असणार आहेत. मागील शारदीय नवराञोत्सवातील अनुभव लक्षात ञुटी दूर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मंदिर प्रशासन, पोलिस, आरोग्य, नगर परिषद, एसटी, महावितरण हे प्रमुख विभाग या नवराञोत्सवासाठी अंत्यत महत्त्वाचे आहेत. या विभागातील सर्व मंडळीना आज बोलवले होते. त्यांच्या कडुन पुर्वतयारीचा आढावा घेतला. यंदा खाजगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांची पायपीठ कमी व्हावी यासाठी चार ते पाच वाहनतळे मंदिर जवळ म्हणजे हाडको उध्दवराव पाटील सभागृह येथे उभारले जाणार आहेत येथुन भाविकांना मंदिर जवळ पडणार आहे. हे भरल्या नंतर बाह्य वानतळात वाहने लावले जावेत असे नियोजन आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक परिवहवन महामंडळांना तात्पुरते बसस्थानक उभारावेत अशा सुचना केल्या आहेत मागील वर्षी गर्दी दिवशी दीड लाख भाव व चाळीस ते पन्नास हजारच्या आसपास वाहने आले होते.
,
अहवाल फोडले प्रकरणी दोषीवर कारवाई करणार -डॉ. ओम्बासे
तुळजाभवानी देवीचे पुरातन दागदागिने मोजदाद अहवाल फुटी प्रकरणी संबधितांना शोकाँज नोटीस पाठवल्या आहेत. कुठल्या व्हॉटसप वरुन अहवाल, बाहेर गेला फुटला त्याचा शोध घेवुन या बाबतीत सदरील तपास सायबरकडे दिला आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी दिली.
.
बाहेरून येणाऱ्या वाहनासाठी क्युआर कोडची व्यवस्था-कुलकर्णी
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीयनवराञ उत्सव सुरक्षा पुर्वतयारी बाबतीत बोलताना पोलिसअधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, शहरावर शंभर सीसीटीव्ही ची नजर असुन बाह्य भागात आणखी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. चोऱ्या मिसींग रोखण्यासाठी क्वीक अँक्शन पथक तयार केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदा क्युआर कोडची उपाययोजना केली असुन मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथुन येणाऱ्या वाहन चालकांनी क्युआर कोड स्कँन केल्यानंतर जवळचे वाहनतळ व दिशांचा मँप त्यांच्या मोबाईल वर येणार आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली.