धाराशिव (प्रतिनिधी)-भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वारंवार जुगाराची जाहीरात बंद करण्याची विनंती केली होती. परंतु अद्याप ही जाहीरात बंद नाही. या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीने आज सर्व गणेश मंडळासमोर सचिन तेंडुलकर यांच्या भीक पेटी ठेऊन त्यांच्या करीता जनतेतून भीक मागून त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी जाहिरात बंद करा नाहीतर भारतरत्न परत करा अशी मागणी मयुर काकडे यांनी केली.

यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी आमचा विरोध तेंडुलकरना नाही परंतु भारतरत्न व्यक्तीस ही बाब अशोभनीय आहे. एकतर त्यांनी जाहीरात बंद करावी नाहीतर भारतरत्न परत करावा. असे आवाहन सचिन तेंडुलकर यांना केले.“अन्यथा आज फक्त धाराशिव येथे आंदोलन उद्या सर्व संपुर्ण महाराष्ट्रातील बस स्टॉप व गणेश मंडळाजवळ तेंडुलकर भिकपेटी व तेंडुलकर सुचना पेटी लावण्यात येणार“ असा देखील इशारा देण्यात आला. या आंदोलनावेळी बाळासाहेब कसबे, महेश माळी, बाळासाहेब पाटील, महादेव चोपदार, शशिकांत गायकवाड, विठ्ठल गायकवाड,सूर्यकांत इंगळे, दशरथ भाकरे, सचिन शिंदे व सर्व प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top