तुळजापूर (प्रतिनिधी) - मराठवाडा काय होता.. इथे निजामशाही कशी आली. त्या निजामशाहीच्या काळात काय परिस्थिती होती. त्या हुकूमशाही विरोधात जो लढा उभा राहिला, तो कसा उभा राहिला आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी हा मराठवाडा निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला. याचा चित्त थरारक  इतिहास 'गाथा मुक्तीसंग्रामाची' या नाट्य प्रयोगाद्वारे दाखविण्यात आला. यावेळी तुळजापूर येथील नाट्य रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'गाथा मुक्ती संग्रामाची' या  नाटकाचे आयोजन धाराशिव जिल्ह्यातील सर्व  आठ ही तालुक्यात करण्यात आले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग सोमवारी 25 सप्टेंबर  रोजी सायंकाळी पूजारी मंगल कार्यालयात संपन्न झाला.

यावेळी अपर तहसीलदार स्वप्नील ढवळे, गटशिक्षणाधिकारी मेहरूनिसा इनामदार, मंडळ अधिकारी अमर गांधले, नेमचंद शिंदे, तलाठी अशोक भानभागे, वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे, जिल्हा समनव्यक विशाल शिंगाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.

या नाट्य प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी विशाल टोले, सागर चव्हाण, सुगत सोनवणे, तन्मय शेटगार,आकाश वाघमारे,अशोक घोलप, बाहेर शेख, सुमित शिंगाडे, सौरभ शिंगाडे, अजय चिलवंत यांनी परिश्रम घेतले.


 
Top