तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीगणेश उत्सव औचीत्य साधुन तुळजापूर येथे सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य कर्मचारी/संवर्ग संघटना वतीने कर्मचारी मेळावा आयोजित केला आहे.
आगामी शारदीय नवराञोत्सव तयारी पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांन मध्ये समन्वय येण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. सचिन ओम्बासे (जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर) हे भूषविणार असुन उद्घाटक म्हणून योगश खरमाटे (उपविभागीय अधिकारी धाराशिव तथा प्रशासक नगर परिषद, तुळजापूर) हे असणार आहेत. यावेळी विशेष उपस्थिती निलेश देशमुख (उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर), रामकृष्ण जाधवर (सहआयुक्त, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव), वसुधा फड (मुख्याधिकारी, नगर परिषद, धाराशिव), श्रीमती. मनिषा वडेपल्ली (मुख्याधिकारी, नगर परिषद, परंडा), संतोष पाटील (तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर प्रशासक, तुळजापूर), दत्तात्रय साळुंके (अध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटना, तुळजापूर), अनिल पारधे (उपाध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटना, तुळजापूर) यांची असणार आहे.
तसेच गिरीष पंडित (मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशी), श्रीमती. शैला डाके (मुख्याधिकारी, नगर परिषद, कळंब), अरविंद बोळंगे (तहसीलदार, तुळजापूर), लक्ष्मणराव कुंभार (मुख्याधिकारी, नगर परिषद, तुळजापूर), तानाजी चव्हाण (मुख्याधिकारी, नगर परिषद, भुम), सचिन भुजबळ (मुख्याधिकारी, नगर परिषद, मुरुम), गजानन घाडगे (पोलीस निरीक्षक, पो.स्टे. तुळजापूर) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. अशी माहिती शिवरत्न आतकरे, नागनाथ काळे (कोषाध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटना, तुळजापूर), अशोक सनगले (नगर अभियंता, न.प. तुळजापूर), रणजित कांबळे (कर निर्धाकर प्र.से., न.प. तुळजापूर) यांनी दिली.