तुळजापूर (प्रतिनिधी)- इंडियन मार्शल आर्ट शोतोकान कराटे-डो फेडेरेशन औरंगाबाद आयोजित दुसऱ्या ओपन ऑल इंडिया नॅशनल कराटे चॅम्पियन शिप औरंगाबाद येथे  दिनांक 27 ऑगस्ट 2023 वार रविवार रोजी  झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये तामलवाडी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून सुवर्ण भरारी घेतली आहे. 

स्पर्धेमध्ये दिल्ली ,कर्नाटक,पंजाब, तेलंगणा,तामिळनाडु व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.  तामलवाडी येथील विद्यार्थानी उस्मानाबाद जिल्ह्या चे प्रतिनिधित्व केले.या स्पर्धा काता व कुमिते या दोन प्रकारात पार पडल्या.हे सर्व विद्यार्थी तामलवाडी येथिल सनराईज इंग्लिश मेडीयम स्कूल चे आहेत. पदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत तृप्ती गुंड 2 गोल्ड मेडल,श्रेया शिंदे 1 गोल्ड 1 ब्रॉन्झ मेडल,तन्वी पाटील 1 गोल्ड 1 ब्राँझ मेडल,नोमन शेख 1 गोल्ड 1 सिल्वर मेडल, विवान रोडे 1 गोल्ड 1 सिल्वर, मेडल विहान रोडे 1 ब्रॉन्झ मेडल, प्रणव शेनमारे 1 गोल्ड 1 सिल्वर मेडल, दीपक कोल 1 गोल्ड 1 ब्राँझ, अमनकुमार बिंद 1 सिल्वर 1 ब्रॉन्झ मेडल. त्यांना विशेष मार्गदर्शन मास्टर इब्राहीम शेख 3 ब्लॅक बेल्ट, व मास्टर दिनकर रोकडे 1  ब्लॅक बेल्ट  तसेच सनराईज इंग्लिश मेडीयम स्कूलचे सचिव. ज्ञानेश्वर बोबडे सर व मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभले. तामलवाडी येथील कराटे क्लास मध्ये मुलांना व मुलींना स्वसंरक्षण, लाठी काठी, जंप, नंनचॅक,अद्यावत स्वसंरक्षनात्मक धडे दिले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त मुला-मुलींनी कराटे प्रशिक्षण घेण्यासाठी  प्रवेश देणे चालू आहे  असे आवाहन मास्टर दिनकर रोकडे यांनी केले आहे. तसेच कराटे  क्लासला तीन वर्षा पुढील मुला- मुलींना सहभाग घेता येईल.  क्लास ला जॉईन करण्यासाठी संपर्क - दिनकर रोकडे 9697121117.


 
Top