परंडा (प्रतिनिधी ) बसमधे प्रवास करताना अज्ञात व्यक्तीने सुमारे 1 लाख 43 हजार रूपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसाकडून दिलेल्या माहितीनुसार दि .11 सप्टेंबर रोजी हनुमंत देवराव शेळके रा . भोत्रा हे चिखलीहून परंडा येथे बसने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बॅगमधून 1 लाख 43 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी हनुमंत शेळके यांच्या तक्रारीवरून परंडा पोलीस स्टेशनमधे अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.