वाशी (प्रतिनिधी)-शहरात माऊली नगर मध्ये रहाणारे आबाराव भानुदास कोल्हे हे शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, म्हणून भूम येथे कार्यरत आहेत,यांची मुलगी कु.सुजाता आबाराव कोल्हे हिची M.P.S.C. 2021 मध्ये घेतलेल्या MPSC COMBINED GROUP B-STI मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे, सुजाता चे प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी, तसेच हायस्कूल शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी,या ठिकाणी झाले तर 11 व12वी शिक्षण दयानंद कॉलेज लातूर येथे तर इंजिनिअर चे शिक्षण DR. BABASAHEB AMBEDKAR TECHNOLOGICAL UNIVERSITY,LONERE,RAIGAD येथे झाले, सुरुवाती पासूनच खूप चिकाटी,अभ्यासू, प्रामाणिक,कोणा बद्दल कधीही तक्रार न करणारी,सतत हसतमुख, मनमिळाऊ स्वाभिमान, कर्तव्य दक्ष गुणी, सगळ्या मैत्रिणींना सामावून घेणारी व्यक्ती, अशी हिची ओळख करून देता येईल, अथक परिश्रम करून तिनें हे यश मिळवले,तिचा आई वडील,भाऊ बहीण यांचा भक्कम पाठिंबा मिळाला,आई वडिलांनचेही कौतुक झाले पाहिजे,तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे असं  असं म्हणत तिला पाठिंबा दिला, आई वडील यांचेही खूप खूप कौतुक होत आहे.


 
Top