वाशी (प्रतिनिधी)- आज ग्रामीण रुग्णालय वाशी येथे मा.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे सर,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हारिदास सर,यांच्या मार्गदर्शनानुसार ,व मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ.दयानंद कवडे सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गोवर्धन महिंद्रकर सर, बालविकास अधिकारी श्री.राठोड जे. जी. वाशी यांच्या पुढाकाराने आजादी का अमृत महोत्सव व रक्षाबंधनचे औचित्य साधुन डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत वाशी तालुक्यातील सर्व आंगणवाडी सेविका व मदतनीस यांची संपूर्ण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये Clinical Breast examination, Oral examination, Dental examination, X-ray तसेच NCD अंतर्गत CBC, BSL(R), URINE (R), BP, LIPID PROFILE, ECG, VIA, ICTC इ. तपासण्या करण्यात आल्या , या तपासणी साठी डॉ. सुधीर अवटे (सर्जन),डॉ. दिपक निभोरकर जनरल कम्युनिटी ऑफिसर उस्मानाबाद,डॉ.कृष्णा उंदरे- देशमुख (दंतशल्यचिकित्सक) वैद्यकीय अधिकारी डॉ.तेजस काळे डॉ.अमर तानवडे डॉ.सजिव गरड, डॉ.प्रविण कुलकर्णी,डॉ.सिध्दिकी मॅडम, व आरोग्य पर्यवेक्षक श्री.पदमाकर कोठावळे श्री.विशाल रणदिवे विस्तार अधिकारी , रुग्णालयीन संपूर्ण अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या शिबिरामध्ये एकुण 251 आंगणवाडी सेविका व मदतनीस यांची तपासणी करून ग्रामीण रुग्णालय वाशी येथे उपचार करण्यात आले.त्यापैकी 18 गंभीर आजारी सेविका व मदतनीस यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद येथे संदर्भित करण्यात येणार आहे.