कळंब (प्रतिनिधी) -डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे संस्थापक सचिव कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या आकराव्या पुण्यतिथी निमित्त दि.24 ऑगस्ट 2023 गुरुवार रोजी महाविद्यालयात 'अभिवादन कार्यक्रमाचे' आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमाचे संस्थेचे अध्यक्ष शाम खबाले, सहसचिव प्रा. संजय घुले, प्राचार्य शशिकांत जाधवर या मानवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी रासेयो विभाग प्रमुख प्रा. जे.बी. जाधव, सौ.मनिषा कळसकर मॅडम व आयक्युएसी विभाग प्रमुख प्रा. अनिल जगताप व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या कडून कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.