तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरचा इतिहासात प्रथमच मंदीर परिसर व शहर विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी विक्रमी असे 1865 कोटी रुपये निधी महायुती सरकार कडुन आणल्या बद्दल राज्याचे महसुल मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते विविध मान्यवरांचा उपस्थितीत शहरवासियांंच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य सत्कार गुरुवार दि. 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता भवानी तिर्थकुंड येथे आयोजित करण्यात आल्याची माहीती भाजप युवा नेते विनोद गंगणे यांनी दिली.  

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात भाविकांना मुलभुत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी येथे 1865 कोटीचे विकास कामे केले जाणार आहेत. वाढत चाललेली भाविक संख्या लक्षात घेवुन श्रीतुळजाभवानी मंदीर परिसर व शहर परिसरात विकास कामे केले जाणार आहेत. 1865 कोटी पैकी 65 कोटी रुपये निधी उपलब्ध झाले आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु केली असुन आठ हजार मंडळी यास उपस्थितीत राहणार यासाठी भाजप युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले सह भाजप कार्यकते परिश्रम घेत आहेत.

 
Top