धाराशिव (प्रतिनिधी)- येत्या ऑक्टोबर महिन्यात श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवात श्रद्धेने सहभागी होण्यासाठी राज्यातून तसेच देशातील विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येणार आहे. महोत्सवाच्या काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी येथे काम करणाऱ्या विविध यंत्रणांचा आपसी समन्वय असणे आवश्यक आहे.असे मत उपविभागीय अधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त सदस्य योगेश खारमाटे यांनी व्यक्त केले.
6 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2023 दरम्यान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनचा शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवाचा पूर्वनियोजन आढावा सभा तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी खारमाटे बोलत होते.
सभेला तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक हेमंत पाटील, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रतिनिधी डॉ.व्ही.एम.आलमेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, तुळजापूर आगार व्यवस्थापक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, महावितरणचे कार्यकारी अभियंता, तालुका क्रीडा अधिकारी, कर्नाटक गुलबर्गाचे उपविभागीय वाहतूक अधिकारी, वैधमापन शास्त्रचे उपनियंत्रक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महंत तुकोजीबुवा, गुरु बजाजी बुवा, महंत चिलोजीबुवा, गुरू हमरोजी बुवा, श्री. तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष, धनंजय लोंढे, किशोर गंगणे यांचे सह अन्य अधिकारी उपस्थित होते.
खारमाटे यावेळी म्हणाले की,नवरात्राच्या काळात सर्व विभागाने सतर्क रहावे.