धाराशिव (प्रतिनिधी)-  इयत्ता दहावी व बारावी शालांत परीक्षा 2025 मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना ॲड व्यंकटराव गुंड यांच्या वतीने अनुक्रमे 2100, 1500, 1100 रुपये, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पालकासह सन्मान करण्यात आला. तसेच जे विद्यार्थी इयत्ता दहावी, बारावीमध्ये विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झालेल्या 46 विद्यार्थ्यांचा पालकासह सन्मान करण्यात आला.  तसेच एनएमएमएस, स्कॉलरशिप, मंथन परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. 

ॲड. व्यंकटराव गुंड यांनी दहावी, बारावी गुणवत्तेबरोबरच, क्रीडा, स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी उपस्थित  जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड .व्यंकटरावजी गुंड,  जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, पाडोळी गावच्या सरपंच मंगलताई एकंडे, हभप. बाबुराव पुजारी, एकंबीवाडीचे उपसरपंच जीवन चव्हाण, विरभद्र शिराळ, सतीश एकंडे, प्रदीप गुंड, राजेंद्र कापसे, हनुमंत चव्हाण मेंढा, बळीराम सगर एकंबीवाडी, आप्पाराव ढाकरे, रुपामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, सुरेश मनसुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सूर्यवंशी, दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, टाकळी, एकंबीवाडी, मेंढा, पाडोळी, येथील पालक, शिक्षण प्रेमी नागरिक  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू शेख यांनी केले.


 
Top