धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषदेत बदलीने उपस्थित झालेले उपमुख्यकार्यकारी अधिकारी भालके पाटील व उपशिक्षण अधिकारी पदी निवड झालेले मिर अली तारेख काझी यांचा अखिल महाराष्ट्र प्रा. शिक्षक संघा तर्फे शाळा व बुके देऊन सत्कार करण्यात आला व सदर शिक्षक संघ सदर शिक्षक संघ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध असल्याचे शिक्षक नेते लालासाहेब मगर व जिल्हाध्यक्ष बशीर तांबोळी यांनी सांगितले. तसेच शिक्षकांच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली सदर शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न येत्या काही दिवसात सोडविणार व एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले तसेच उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेले मीरअली तारेख काजी यांचाही शिक्षक संघातर्फे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर जिल्हाध्यक्ष बशीर तांबोळी, बाळासाहेब वाघमारे, मालोजी वाघमारे, मारोती काळे, सविता पांढरे, संजय भालेकर, शिवाजी साखरे, ज्ञानेश्वर घोडके, बाळासाहेब माने, महेंद्र रणदिवे, संजय भालेकर,न. प. विभाग जिल्हाध्यक्ष, राजेंद्र पवार, सोमनाथ केवटे, ज्ञानेश्वर घोडके, नवनाथ चौरे, राजाभाऊ काकडे इत्यादी उपस्थित होते.