धाराशिव ( प्रतिनिधी) -येथील रामकृष्ण  परमहंस महाविद्यालयात दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून भारताचे पितामह महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व त्यानंतर प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
यावेळी राष्ट्रीय छत्र सेनेचे कॅडेट्स यांच्याकडून स्टाईलमार्च करून राष्ट्रध्वजाला आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना मानवंदना देण्यात आली. 
प्रसंगी मराठी विभागाच्या वतीने रान कवी ना.धो. महानोर यांच्या कवितेवर भित्तिपत्रिकेचे आयोजन केलेले होते.या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख उद्घाटक म्हणून बोलताना म्हणाले की, रान कवी ना.धो. महानोर हे असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचे खूप नुकसान झाले आहे. त्यांच्यासारखाच मराठवाड्यातून एखादा कवी आपल्या रूपाने पुढे यावा अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.   यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले , यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. माधव उगिले ,प्रा मोहन राठोड यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा कनिष्ठ विभागाचा विद्यार्थी विशाल माने बोर्डाच्या परीक्षेत मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.आंबेकर यांची पीएच.डी  मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. 
 यावेळी प्र.प्रचार्य प्रकाश कांबळे,प्र.प्रचार्य शिंदे, प्र.प्राचार्य पवार , प्रभारी प्राचार्य डॉ.विद्या देशमुख, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.सूर्यवंशी उपस्थित होते.
   
 
Top