धाराशिव ( प्रतिनिधी) - येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांनी ध्वजारोहण केले.
या कार्यक्रमास आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , सरचिटणीस सौ . प्रेमाताई पाटील , प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील , संस्था सदस्य संतोष कुलकर्णी , के. के जाधव , महेश शिंदे , राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पठाण वाय. के , सन्मानीय सेवानिवृत्त शिक्षक आणि उपप्राचार्य घार्गे एस. के., उपमुख्याध्यापक कोळी एस .बी तसेच पर्यवेक्षक इंगळे वाय. के., कोरडे एस.जी\, गोरे एन. एन , गायकवाड के.वाय , जाधव आर .बी , देशमुख डी.ए , श्रीमती गुंड बी.बी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर एमकेसीएलचे जिल्हाप्रमुख धनंजय जेवळीकर, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी , जेष्ठ विधिज्ञ मिलिंद पाटील यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. त्याचबरोबर आय.आय.टी व शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एन. सी. सी. , स्कॉऊट गाईडच्या पथकाने संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या संचलनासाठी अथक परिश्रम घेणारे शेंडगे, वाघमारे एस. के., सौ . देशमुख ए. एस., प्राध्यापिका श्रीमती देशमुख यांचे कौतुक प्राचार्यांनी केले.
संगीत शिक्षक महेश पाटील व त्यांच्या बालचमूने राष्ट्रभक्तीपर गीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्राचार्य साहेबराव देशमुख आपल्या भाषणात सांगितले की, आज देश विकासाची घोडदौड करत असून भविष्यातही अशीच प्रगती कायम ठेवण्या करिता आजच्या पिढीने प्रयत्नशील रहावे , असा मोलाचा सल्ला यावेळी दिला.
या निमित्ताने प्रशालेचे प्राचार्य व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे छायाचित्रण कलाध्यापक शेषनाथ, एस.डी. भोसले यांनी पाहिले तर सूत्रसंचालन पाटील एस.सी , सौ. मस्के जे. बी. , संदीप जगताप, कापसे यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक कोळी एस. बी. यांनी मानले.