धाराशिव (प्रतिनिधी) -शहरामध्ये राजमाता जिजाऊ चौक या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राजमाता जिजाऊंचे पूजन करून विभाजन विभिषिका फाळणी दिवस निमित्त आयोजित मुक पदयात्रा ची सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेमध्ये श्रीपतराव भोसले हायस्कूल, शरद पवार हायस्कूल, तेरणा महाविद्यालय, व्यंकटेश महाजन महाविद्यालय येथील बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. जिजाऊ चौकातून निघालेली ही पदयात्रा लेडीज क्लब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह इथपर्यंत येऊन या ठिकाणी विसर्जित करण्यात आली.
त्यानंतर नाट्यगृहाच्या बाहेरील पॅसेज मध्ये फाळणी संदर्भातील चित्र प्रदर्शनी चे उद्घाटन आ. राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य, बुबासाहेब जाधव, सुरेशभाऊ देशमुख, नितीन काळे, सुधीर पाटील, एडवोकेट अनिल काळे, बाळासाहेब क्षिरसागर, सुनील काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, रामदास कोळगे, डॉ. चंद्रजीत जाधव, अभय इंगळे ,राहुल काकडे, सुजित साळुंके, इंद्रजित देवकते, प्रविण पाठक व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.