तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील  तुळजाभवानी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त गुरुवार दि 24रोजी  सकाळी 11.30वा  राज्यस्तरीय कवि सम्मेलन  आयोजित करण्यात आले आहे. डॉ. मधूकर हुजरे या कविसंमेलनाचे उदघाटन श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांच्या होणार आहे. 

तर या कार्यक्रमास  प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक  सुनिल रोचकरी तर हे उपस्थितीत राहणार आहे. तर प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर  अध्यक्षस्थानी असणार  आहेत. या कवि संमेलनात हनुमंत पडवळ, कृष्णा साळुंके, डॉ. अरविंद हंगरकेकर, श्रीमती. पुजा माळी, श्रीमती वंदना कुलकर्णी, ॲड. शुभदा पोतदार, श्रीमती शैलजा कारंडे, श्रीमती शशिकला गुंजाळ, प्रा. अलका सपकाळ हे कविता सादर करणार आहेत.


 
Top