धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील जहागीरदारवाडी येथे दि.18 ऑगस्ट 2023 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

जहागीरदारवाडी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 530 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 80 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीरात प्रमुख पाहुणे सरपंच शशिकांत राठोड, उपसभापती कृषी उत्पंन्न बाजार  समिती धाराशिव शेषेराव चव्हाण, ग्रा.प सदस्य गेणदेव राठोड,विलास सुरवसे, राजाराम राठोड, प्रभाकर चव्हाण, विठ्ठल राठोड, सतिष राठोड, गौतम चव्हाण, संतोष राठोड, मधुकर रणखांब, मधुकर कांबळे, अमोल रणखाब, अशोक मिसाळ इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. ओम खानापूर, डॉ. मयुर पाटील, डॉ.आक्षय कांबळे, डॉ. धनवी मोरे डॉ. मुक्ता थीटे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे आमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, योगेश मारडकर, प्रा. आरोग्य उपकेंद्र कुमाळवाडी परिचारीका चंद्रकला गाढवे, महाविर कंदले आशा कार्यकर्त्या वैशाली सुसवसे, जयश्री सुरवसे यांनी परिश्रम घेतले. 


 
Top