धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्याची वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पर्यवेक्षक आर. बी .दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
कलाध्यापक शेषनाथ वाघ प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, महापुरुषांचे कार्य विद्यार्थ्यांना ज्ञात होणे गरजेचे असून आज रोजी महापुरुषाबाबत मतमतांतरे या पिढीस काय आदर्श ठरतील. जयंती, पुण्यतिथी साजरी का करणे गरजेचे आहे ही बाब नमुद केली. प्रमुख पाहुणे आर.बी. जाधव वत्कृत्व स्पर्धेचे आयोजनाचा आशय विशेद केला. आज विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर सहभाग नोंदवावा जेणे करुन तो पुढे मोठा व्याख्याता बनू शकेल असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सह शिक्षक डी.एस.शिराळ, बी.टी. गवळी, एस.एन.धोंगडे, व्ही. बी. लोमटे, राठोड श्यामराव, चद्दे सतिश, ए. ई. काकडे, सहशिक्षीका सौ. एस.ए. देशमाने, एस.एस. ईश्वरगोंडा, पी. पी. मैत्रे, सौ.साळवी, सौ.घोसले, डी.एल. कांबळे, उपस्थित होते. वत्कृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्रीमती जे. बी. मस्के, सहशिक्षक डी.टी. केंगार यांनी पाहिले.
