धाराशिव (प्रतिनिधी)-तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबाद येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विक्रम सिंह माने यांचे हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
यावेळी डॉ. विक्रमसिंह माने यांनी लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यलढा यासाठी दिलेले योगदान, परखड पत्रकारिता याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर एन.एस.एस.चे प्रा.प्रमोद तांबारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्र व फकीरा कादंबरी व इतर लेखनाबद्दल विवेचन केले .लोकशाहीरांनी श्रम प्रतिष्ठेला महत्त्व देऊन श्रमिकांना आपल्या लेखणीतून न्याय देण्याचा प्रयत्न केला असे डॉ.उषा वडणे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले. याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख,
कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते त्यानंतर प्रा.योगिता अजमेरा यांनी आभार प्रदर्शन केले.