धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे, तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक प्रशांत पवार यांनी रमाई आवास योजनेच्या खात्यावर जमा असलेल्या रक्कमे पैकी 21 लाख 64 हजार 922 रूपये योजनाबाह्य खर्च केल्याबद्दल शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी, सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल, प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.21.01.2021 ते 18.11.2022 या कालावधीत नगर परिषद धाराशिव येथे रमाई आवास योजनाच्या खात्यावर जमा असलेले 3,14,79,000 पैकी 2,93,14,078 रुपये शिल्लक असल्याचे दिसुन येते त्यांनी मंजुर झालेल्या कामावर खर्च न करता योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केली आहे.तसेच लोकशाहीर आण्णाभाउ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे धंदा- नोकरी लेखापाल नगर परिषद धाराशिव, रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. धाराशिव हा. मु. रा. समर्थ नगर धाराशिव यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.