परंडा ( प्रतिनिधी )- भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त रेणुका व्हॉलीबॉल संघ डोंजा आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ. वैशालिताई मोटे यांच्या हस्ते करण्यात आले व स्पर्धेसाठी आलेल्या व सर्व संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या, यावेळेस बोलतांना हा भाग सीना कोळगाव धरणामुळे हिरवाईने नटला आहे भागातल्या लोकांचे जीवनमान उंचावले आहे ही आनंदाची बाब आहे पण हे सगळे घडवण्यामध्ये मोटे घराण्याचा मोठा वाटा आहे हे लोकांनी विसरू नये भविष्यात पण आणखी विधायक कामे आपल्याला करायची आहेत त्यासाठी कार्यकर्यांनी एकसंघ राहण्याची विनंती या निमित्ताने केली तसेच परंडा कृषिउत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती उपसभापती व सर्व नूतन संचालकांचा सत्कार समारंभ यावेळी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीचे मा पंकज नाना पाटील आणि त्यांची टीम यांनी केले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कांग्रेस आय चे जेष्ठ नेतेऍड दादासाहेब खरसडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धनंजय पाटील ,भाऊसाहेब खरसडे, धनंजय मोरे उपसभापती संजय पवार बापू मिस्किन डॉ रवींद्र जगताप किरण शिंदे ,धनंजय आबा हांडे,दीपक पाटील बंडू रगडे हरिभाऊ नलवडे दादा घोगरे सोमनाथ सिरसट सुदाम देशमुख ऍड सुजित देवकते बाबुराव काळे सर, रेवन ढोरे,लखन दुरूंदे,,प्रशांत गायकवाड राजेंद्र गायकवाड रानजगजित नेटके सुरेश दादा गाढवे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महाविकास आघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंकज नाना पाटील यांनी प्रास्ताविक केले सुत्रसंचलन बाबुराव काळे सर यांनी केले तर आभार धनंजय पाटील यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली.