परंडा (प्रतिनिधी ) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या विशेष प्रयत्नाने परंडा तालुका कार्यक्षेत्रातील गांवामध्ये नागरीकांची आरोग्य तपासणी करण्या करीता मोबाईल मेडिकल व्हॅन ,अत्याधुनिक फिरता दवाखाना मिळाला. या फिरता दवाखाण्याच्या माध्यमातून गांवामध्ये सर्वांगीण रुग्णसेवा रूग्णांना मिळत आहे. आशिया खंडातील सर्वात अत्याधुनिक मोबाईल हॉस्पिटल व्हॅन यामध्ये विविध अत्याधुनिक निदान व उपचाराच्या सोयी उपलब्ध आहेत. या अत्याधुनिक दवाखाण्याच्या माध्यमातून दि. 22 ते 25 ऑगस्ट पर्यंत परंडा तालुक्यातील लाभार्थ्यांनी, रुग्णांनी लाभ, उपचार घेऊन मार्गदर्शन मिळविले आहे. या उपक्रमात सुमारे 748 रूग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले असून यामधे पुरुष रुग्ण 436 स्त्री रुग्ण 312, बालके 227 आहेत. एक्स रे लाभार्थी 64 ने, नेत्रतपासणी 486, रक्त तपासणी 341,रेफरल 33 अशाप्रकारे आशिया खंडातील सर्वात अत्याधुनिक मोबाईल हॉस्पिटल व्हॅन म्हणजे अत्याधुनिक फिरता दवाखाना याचा लाभ परंडा तालुक्यातील गरजू रुग्णाना झाला आहे.
शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत फिरता दवाखाना या आरोग्यदाई, जीवनदाई आरोग्य रथाचे स्तुत्य उपक्रमाचे स्वागत ग्रामीण दुर्गम भागातील नागरीकातून होत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास हे हेल्थ मिशनवर लक्ष ठेवून आहेत.तसेच प्रत्यक्ष फिल्डवर स्वतः परंडा उपजिल्हा रुग्णालयाचे मेडिकल सुप्रीटेंडंट डॉ.विश्वेश कुलकर्णी व तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.विनय कुलकर्णी हे मोबाईल व्हॅन टीम बरोबर कार्यरत आहेत.या सर्वांच्या अथक परिश्रमातून या आठवड्यात परंडा तालुक्यातील 748 रुग्णांनी अत्याधुनिक फिरता दवाखाना जीवनदायी आरोग्यदायी अशा आरोग्य रथ संकल्पनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला.