धाराशिव (प्रतिनिधी) - मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विषयी अपशब्द वापरले. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भुजबळ यांच् दि.29 ऑगस्ट रोजी निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) च्यावतीने बीड येथील आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांच्या विषयी अपशब्द वापरले होते. त्यामुळे भुजबळ यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्यावतीने मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. तसेच यापुढे असे कोणत्याही नेत्याने बेताल वक्तव्य कराल तर त्याला राज्यामध्ये फिरू देणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी छगन कमळ बघ.... छगन भुजबळच करायचं काय, खाली मुंडकं वर पाय.... गद्दार भुजबळचा धिक्कार असो.... मुर्दाबाद मुर्दाबाद, छगन भुजबळ मुर्दाबाद.... अशा विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, प्रदेश सचिव रोहित बागल, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर, वाजिद पठाण, शहराध्यक्ष आयाज शेख, जयंत देशमुख, श्वेता दूरुगकर, माजी नगरसेवक बाबा मुजावर, मृत्युंजय बनसोडे, युवक जिल्हा सरचिटणीस गणेश एडके, अतुल आदमाने,तालुका संघटक कुलदीप सुर्यवंशी, रणवीर इंगळे, पंकज भोसले, सुरज वडवले, सरफराज कुरेशी, नारायण तुरुप, कुणाल कर्णवर, हेमंत मोरे, संजय देशमुख, सुभाष गव्हाळे, संतोष अपसिग़ेकर,विद्यार्थी शहराध्यक्ष पृथ्वीराज मुळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top